आमच्याविषयी थोडक्यात
सन १९९५ रोजी या मंदिराची जागा वारजे जकात नाका येथे विकत घेतली होती. आमच्या घराण्यात श्री दत्तात्रेयांची सेवा करणारे माझे आजोबा - कै. भाऊसाहेब रंगनाथ वाल्हेकर व त्यांचे चुलत बंधू कै. अरविंद बाबुराव वाल्हेकर (कानगाव - दौंड, पुणे) हे दोघेही मोठे श्री दत्त भक्त होते. तीच परंपरा वारसा यांचेकडून माझ्याकडे आला आहे.
१ जानेवारी २००५ रोजी सकाळ वर्तमानपत्रात प. पूजनीय योग तपस्वी श्री नारायण काका ढेकणे महाराज यांच्याविषयी फोटो छापून आला होता. ते कर्वेरोड येथील वासुदेव निवास येथील प्रमुख विश्वस्त म्हणून काम पाहत होते. तसेच नाशिक येथील प. पूजनीय श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज यांचा मठ असून तेथे प्रमुख विश्वस्त म्हणून काम पाहत होते. महाराजांना भेटण्याची तीव्र इच्छा झाल्याकारणाने मी दिनांक २४ फेब्रुवारी २००५ रोजी महाराजांच्या भेटीसाठी नाशिक ला प्रयाण केले. तेथे गेल्यानंतर मी पुण्याहून आपल्या भेटीसाठी आलो आहे...
पुढे वाचाआमचे प्रेरणास्थान व आशीर्वाद

परमहंस परिप्रकाचार्य श्री लोकनाथ तीर्थ स्वामी महाराज

परमहंस परिप्रकाचार्य श्री टेम्बे स्वामी महाराज

प पु. सद्गुरू योगीराज श्री वामनराव गुळवणी महाराज

प पु सद्गुरू विद्यावाचस्पती श्री दत्त कवीश्वर महाराज

योग्य तपस्वी गुरुवर्य श्री नारायण काका ढेकणे महाराज
कार्यक्रम प्रणाली
गुरुपौर्णिमा
आषाढातील शुक्ल पक्ष पोर्णिमेला गुरूपौर्णिमा असे म्हणतात. या दिवशी गुरूंची पुजा केली जाते. संपूर्ण देशात हा सण मोठ्या श्रद्धेने आणि आनंदाने साजरा केला जातो. प्राचीन काळात विद्यार्थी आश्रमात शिक्षण घेत असताना भावपूर्ण श्रद्धेने गुरूपूजा करून गुरूदक्षिणा देत असत. चारही वेदांवर पहिल्यांदा भाष्य करणाऱ्या व्यास ऋषिंची आजच्या दिवशी पूजा केली जाते. व्यासांनीच लोकांना वेदाचे ज्ञान दिले. ते आपले आद्यगुरू आहेत. त्यामुळे गुरू पौर्णिमेला व्यास पोर्णिमा असेही म्हटले जाते. म्हणूनच या दिवशी आपण आपल्या गुरूला व्यासांचा अंश मानून त्यांची पूजा केली पाहिजे.
दत्तजयंती
दत्तजयंती ही हिंदू पंचांगात असलेल्या मार्गशीर्ष पौर्णिमा या तिथीला साजरी केली जाते. दत्तात्रेय किंवा दत्त हे अत्री ऋषी व माता अनसूया (अनुसया नव्हे!) यांचे पुत्र होत. तीन तोंडे, सहा हात, दोन पाय, चतुर्वेददर्शक चार श्वान व जवळ कामधेनू (गोमाता) असलेले श्रीदत्तगुरू हे ब्रह्मा, विष्णु, महेश यांचे एकस्वरूप आहे. श्रीगुरुदेव दत्त हे हिंदू धर्मातील पहिले गुरू समजले जातात. दत्त जयंतीच्या दत्ताच्या देवळात दिवशी भजन, कीर्तन होते. संध्याकाळच्या वेळी दत्ताचा जन्म झाला असे मानतात; त्यामुळे त्या वेळी जन्माचे कीर्तन असते. देवळावर रोषणाई केली जाते.
कार्यकारी संघ

श्री संजय बाळासाहेब वाल्हेकर (प्रमुख विश्वस्त)

श्री गणेश विलास वाल्हेकर
(उपाध्यक्ष)

सौ मंजुषा संजय वाल्हेकर
(खजिनदार)

श्री योगेश धनंजय लिमये
(सचिव)
संपर्क साधा
पत्ता
वारजे, पुणे, महाराष्ट्र - ४११०५८मंदिर उघडण्याची वेळ
पहाटे ०५:३० ते दुपारी ०१:३०
सायंकाळी ०३:३० ते ०९:३०
मंदिराची वेळ
दुपारी ०१:३० ते ०३:३० मंदिर बंद राहील
फक्त गुरुवारी मंदिर दिवसभर उघडे असते आणि रात्री १०:०० वाजता बंद होते


